बदलत्या ऋतूत अनेकदा सर्दी, खोकल्यासह ताप येतो. ताप गेला तरी अशक्तपणा राहतोच.
अशक्तपणामुळे काही खावेसे वाटत नाही, काम करण्याची ताकद नसते. पण काही उपायांनी वीकनेस घालवता येतो.
वीकनेस आल्यास नारळपाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट होते आणि उर्जाही मिळते.
तापात किंवा नंतरही तोंडाची चव जाते. अशावेळी हलके पण चविष्ट सूप पिण्याने पचन सुधारते व अशक्तपणाही दूर होतो.
तापात शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशा वेळी थोड्या वेळाने सतत पाणी पित रहावे. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
अशक्तपणा दूर करण्याचा उत्तम उपाय म्हणजे ड्रायफ्रुट्स खाणे. काजू, मनुका, बदाम व पिस्ता खाल्ल्याने उर्जा मिळते.
तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. जास्त स्ट्रेस न घेता शांत रहा. हलका आहार घ्या व मन शांत ठेवा.