गरमीमुळे आपल्यापैकी अनेकांना डोक्याला, केसांना घाम येतो. पण काही वेळेस ही समस्या गंभीरही असू शकते.
डोक्याला घाम येण्याची काय कारणे असू शकतात, जाणून घेऊया.
डोक्याला खूप घाम येणे हे ॲलर्जीचेही लक्षण असू शकते. एखाद्या पदार्थाच्या ॲलर्जीमुळे असे होऊ शकते.
तणाव किंवा स्ट्रेस हे डोक्याला घाम येण्याचे सर्वात मोठे कारण असू शकते. यामुळे हा त्रास कधीही होऊ शकतो.
पॅनिक ॲटॅक आल्यास थरथर, घाम येणे आणि चक्कर येण्याचा त्रास होतो. डोक्याला घाम येण्यामागचे एक कारण पॅनिक ॲटॅक हेही असू शकते.
हार्ट पंपिंग किंवा हृदयाची गती धिमी झाल्यास अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकीच एक म्हणजे डोक्याला घाम येणे.
डोक्यापर्यंत नीट रक्ताभिसरण न झाल्यासही खूप घाम येऊ शकतो. त्यापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरते.
डोक्याला खूप घाम येत असेल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा व योग्य उपचार घ्या. अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात.