फॅटी लिव्हर लक्षणाशिवाय वाढतो. लठ्ठपणा, डायबिटीज आणि खराब लाईफस्टाईलमुळे तो होतो. डाएटमध्ये सुधारणा न केल्यास लिव्हर फायब्रोसिस वा कॅन्सरपर्यंतही जाऊ शकतो.
न्युट्रीशनिस्टच्या मते योग्य आहार लिव्हरची सूज कमी करु शकतात.रोज काही नैसर्गिक पदार्थ खाल्ल्याने फॅटी लिव्हरला कंट्रोल करता येते.
ब्लॅक कॉफीतील कॅफीन लिव्हरला प्रोटेक्स करते. हे फॅटी लिव्हरच्या प्रोग्रेशनला हळू करते. लिव्हरच्या आजाराची रिस्क कमी करते. साखरेशिवाय पिणे चांगले.
ब्ल्युबेरीज मध्ये एंथोसायनिन्स असते. हे पॉवरफुल एंटी-इंफ्लेमेटरी कम्पाऊंड आहे. हे लिव्हरच्या सेल्सची सूज कमी करते. तसेच ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसपासून बचावात मदत करते.
आवळ्यात व्हिटामिन 'सी' भरपूर असते. हा शरीरातील फ्री रेडिकल्सचा कमी करतो. लिव्हरमध्ये जमलेली फॅट घटवण्यास मदत करतो. रोज आवळा किंवा आवळा सरबत पिणे फायद्याचे असते.
एव्होकाडोत ग्लुटाथायोन असते. जे लिव्हरचे डिटॉक्स करते.लिव्हर सेल्सला रिपेअर आणि रिजनरेशनलाही मदत करते. याने फॅटी लिव्हरची समस्या हळूहळू कमी होते.
हळदीतील करक्युमिन सूज कमी करते. तर काळी मिरी याच्या शोषणाला वाढवते. हे कॉम्बिनेशन लिव्हर इंफ्लेमेशन कमी करुन फॅटी लिव्हरपासून वाचवते.
या आहारासोबतच वजन नियंत्रण, रेग्युलर फिजिकल एक्टीव्हीटी आणि व्यायाम यामुळे फॅटी लिव्हर बरा होण्यास मदत होते.