रणरणत्या उन्हामुळे अंगाची तलखी होताना काही गार प्यावंसं वाटतं. पण कोल्डड्रिंक्समुळे शरीराचे नुकसान होऊ शकतं.
अशा वेळी घरच्या घरी काही ज्यूस पिऊन तुम्ही हायड्रेटेड राहू शकता आणि उन्हाचा त्रास दूर पळवू शकता.
उन्हाळ्यात नारळपाणी पिणे खूपच फायदेशीर असते.
कलिंगडामध्ये 90% पाणी असतं. हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही कलिंगडाचा ज्यूस पिऊ शकता.
उसाचा रसही डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतो.
लिंबूपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड आणि थंड राहण्यास मदत होते.
तुम्ही ऑरेंज ज्यूस पिऊनही उन्हाची तलखी कमी करू शकता.