27  जानेवारी 2025

एक महिना सकाळी कोमट पाणी प्यायल्याने काय फायदे होतात? जाणून घ्या

काही लोकं सकाळी लवकर उठून रिकामी पोटी कोमट पाणी पितात. आरोग्यासाठी हे फायदेशीर मानलं गेलं आहे.

रोज सकाळी महिनाभर कोमट पाणी प्यायलं तर शरीरात काही बदल दिसून येऊ शकतात. जाणून तज्ज्ञांचं म्हणणं..

जयपूरचे आयुर्वेदिक तज्ज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितलं की, सकाळी रिकामी पोटी कोमट पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येतं. कारण रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते. 

कोमट पाणी पोट साफ करण्यासाठी फायदेशीर असते. कारण आतड्यांमध्ये असलेली घाण साफ करण्यास मदत करते. 

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. 

कोमट पाणी लठ्ठपणा आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. यासोबत आहार आणि वर्कआऊटही महत्त्वाचे आहे. 

कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे फिट अँड फाईन राहण्यास मदत होते.