10 फेब्रुवारी 2025
बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घ्या
बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, ए, फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नशियम, पोटॅशियम, ग्लूकोज, कार्बोहायड्रेट आणि अँटी ऑक्सिडेंट मिळते.
बडीशेप आणि खडीसाखऱ यांच्यात पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचे शरीराला काही फायदे होतात.
बडीशेप आणि खडीसाखर याच्यात आयर्न चांगल्या प्रमाणात असतं. एकत्र खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं.
बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने पोटातील विकार कमी होतात. गॅस, अपचन आणि एसिडिटी कमी होण्यास मदत होते. पंचनसंस्थाही चांगली राहते.
बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्याने तोंडाला येणार घाण वास दूर होण्यास मदत होते. एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे.
दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने गळ्याला आराम मिळतो.तसेत घशाची खवखव आणि कफ कमी करण्यास मदत होते.
बडीशेपमध्ये पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.