28 फेब्रुवारी 2025

एक महिना जराही तेल खाल्लं नाही तर काय होईल? जाणून घ्या

भारतात जेवणात सर्रास तेल आणि मसाल्याचं वापर केला जातो. रिपोर्टनुसार, एक भारतीय वर्षाला जवळपास 18 किलो कुकिंग ऑईल खातो. 

तेलाचं सेवन अधिक केल्याने वजन वाढतं आणि आजारांना निमंत्रण मिळतं. त्यामुळे तेलाचं सेवन कमी प्रमाणात केलेलं बरं..

अनेकजण फिटनेस राखण्यासाठी तेलाचं सेवन कमी करतात. जास्तीत जास्त उकळलेल्या पदार्थांचा आहारात समाविष्ट असतात. पण एक महिना तेलच खाल्लं नाही तर काय?

डॉ. किरण गुप्ता यांच्या मते, जर तेल खाल्लंच नाही तर एका महिन्यात वजन घटल्याचं दिसून येईल. तसेच शरीरात बदल झाल्याचं दिसून येईल.

इतकंच काय तर त्वचा तजेलदार होईल. तसेच पिंपल्स किंवा इतर समस्याही कमी होतील. 

अनेकजण तेल वर्ज्य करण्यासाठी सूप, साधं वरण, उकललेल्या भाज्या खातात. यामुळे पचनक्रिया सुधारते.

रिफाइंड तेल वर्ज्य केल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच हृदयाची निगडीत आजारही कमी होतात. 

वजन आणि हृदयाशी निगडीत आजारांना दूर ठेवण्यासाठी तेलाचं सेवन योग्य प्रमाणात केलं पाहीजे.