चहा घेण्यापूर्वी पाणी प्यायल्याने काय होतं? जाणून घ्या

10 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

जवळपास प्रत्येक घरात चहा हे पेय बनतं. पण चहाच्या व्यसनामुळे पोटाशी निगडीत विकार होऊ शकतात. चहा घेण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य? ते जाणून घ्या

चहामध्ये कॅफीन असतं आणि रिकामी पोटी घेतल्याने एसिड वाढतं. पण चहापूर्वी पाणी प्यायल्याने यापासून दिलासा मिळू शकतो. चहाचा थेट परिणाम होत नाही. तसेच एसिडीटी आणि गॅस होत नाही. 

सकाळी आपलं शरीर हे डिहायड्रेटेड असतं. जर पहिल्यांदा पाणी प्यायलं तर शरीरातील पाण्याची उणीव दूर होते. 

जर पाणी किंवा काहीही न खाता चहा प्यायला तर भूक मरते. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. 

पाणी प्यायल्याने शरीराती टॉक्सिक तत्त्व मूत्रमार्गे निघून जातात. तसेच कॅफीनचा थेट प्रभाव लिव्हरवर होत नाही. 

चहामधील कॅफीन कधी कधी हार्टरेट वाढवू शकतं. पाणी प्यायल्याने शरीरातील ब्लड फ्लो आणि प्रेशर संतुलित राहतं.

चहा पिण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात 2-3 थेंब लिंबू किंवा एक चिमुटभर हळद टाकू शकता. यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होतात.