रात्रभर पाण्यात भिजवलेले मखाने सकाळी खाल्याने काय होतं? 

11 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

मखान्यात व्हिटॅमिन बी, ए, सी असतं. तसेच प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडेंट असतं.

मखान्यात पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रात्रभर पाण्यात भिजवलेले मखाना सकाळी खाल्याने आरोग्यवर्धक फायदे होतात. 

भिजवलेल्या मखान्यात फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. सकाळी रिकामी पोटी खाल्याने पचनसंस्था सुधारते. 

मखान्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं. यामुळे हळू हळू पचतं आणि ब्लड शुगर लेवलमध्ये राहते. मधुमेही रुग्णांसाठी हे फायदेशी आहे. 

भिजलेले मखाना खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. त्यामुळे जास्तीचं खाण्याची गरज भासत नाही. यात कॅलरी कमी असताता. त्यामुळे मेटॉबॉलिज्म वाढतं आणि फॅट बर्न करतं. 

मखान्यात अँटीऑक्सिडेंट आणि मॅग्निशियम असतं. यामुळे कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात राहतो. हृदयाचा आरोग्य चांगलं राहतं. 

भिजलेले मखाना खाल्याने डोकं शांत राहतं. तसेच झोपही चांगली लागते. त्यामुळे तणावाची स्थिती नियंत्रणात राहते