15 october 2025
Created By: Atul Kamble
शरीरातील कार्य नीट चालण्यासाठी फायबर,प्रोटीन, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन्ससह पोटॅशियमचीही गरज असते.त्याचे कमतरतेचे दुष्परिणाम कमी लोकांना माहिती आहेत
पोटॅशियमत एक इलेक्ट्रोलाईट असते जे शरीरातील इलेक्ट्रिकल सिग्नल्सना नियंत्रित करते.शरीरातील प्रत्येक पेशी योग्यप्रकारे काम करण्यासाठी ते गरजेचे असते
आपण चालत असो, विचार करत असो किंवा धावत असो वा कोणतीही फिजिकट एक्टीव्हीटी करत असतो तेव्हा पोटॅशियमचा महत्वाची भूमिका असते.त्यामुळे पोटॅशियम युक्त आहार गरजेचा आहे.
पोटॅशियम स्नायूंची निर्मिती -विकास करणे,त्यांना योग्य प्रकारे ठेवण्यासाठी गरजेचे असते.मसल फंक्शनसाठी ते गरजेचे असते. हार्टबिट योग्य ठेवण्यासाठी ते गरजेचे असते.
शरीरात पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्यावर हृदयाची ठोके कमी होणे, किंवा थांबून थांबून होणे, श्वास घेण्यास त्रास, कमजोरी किंवा छातीत दुखणे अशा समस्या होऊ शकतात. यावर उपचार केला नाही तर किडनीची समस्या होऊ शकते.
केळी, संत्री, एव्हाकोडो,जर्दाळू तसेच पालक, टोमॅटो, बटाटे,रताळी, बीट, मशरुम,नारळपाणी,मूग डाळ,चणे, दूध,दही, नाचणी ,दालचीनी आणि ओव्यात पोटॅशियम असते.
पोटॅशियमच्या जास्त प्रमाणाने देखील शरीराचे नुकसान होते.त्यामुळे शरीरात काही बदल जाणवल्यास डॉक्टरांना भेटा.
पोटॅशियमच्या जास्त प्रमाणाने देखील शरीराचे नुकसान होते.त्यामुळे शरीरात काही बदल जाणवल्यास डॉक्टरांना भेटा.