सर्वायकल कॅन्सरचा त्रास नेमका कुठे होतो? 

15 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

सर्वायकल कॅन्सर स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीशी संबंधित एक गंभीर आजार आहे.  स्त्रियांच्या गर्भाशयाच्या खालच्या भागामध्ये होतो.

गर्भाशयाच्या मुखातील निरोगी पेशी त्यांच्या डीएनएमध्ये बदल घडवून आणतात तेव्हा सर्वाइकल कॅन्सर सुरू होतो. वेळीच उपचार मिळाले नाहीत तर धोकादायक ठरू शकतं.

सर्वायकल कॅन्सरमुळे शरीराच्या काही भागात वेदना होऊ शकतात. चला नेमकं जाणून घेऊयात, कुठे आणि कसं ते.. 

सर्वात सामान्य म्हणजे ओटीपोटात किंवा गर्भाशयाभोवती वेदना  होतात. या वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकतात.

सर्वायकल कॅन्सरचा प्रभाव टिशूज आणि नसांवर दाब टाकतो. त्यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. वेदना या खेचल्यासारख्या होतात.

सर्वायकल कॅन्सरमुळे लिम्फ नोड्स किंवा नसांवर परिणाम होत असेल तर कंबरेपासून पायापर्यंत वेदना होतात. जडपणा वाटतो. कधीकधी पायाला सूज येते.

सर्वायकल कॅन्सरमुळे मूत्रसंस्थेवर परिणाम दिसून येतो. लघवी करताना अस्वस्थता, जळजळ किंवा वेदना होऊ शकतात. 

अक्षयतृतीयेला सोनं खरेदी करता आलं नाही, तर असं कराल