कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. तसेच व्हिटॅमिन सी, फायबर आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील असते.
कडुलिंबाची पानात पोषक तत्त्व असतात. रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. चला जाणून घेऊयात.
आहारतज्ज्ञ परमजीत कौर यांच्या मते, कडुलिंबाच्या पानं खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात मदत होते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. सर्दी खोकल्यासारखे आजार लांबच राहतात.
कडुलिंबाची पानं मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशी आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत होते.
कडुलिंबाची पाने आतड्यातील हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकतात. तसेच पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्यास मदत होते.
कडुलिंबाच्या पानात बुरशीविरोधी गुणधर्म असतात. यामुळे डोक्यातील कोंडा, टाळूचा संसर्ग, केसाची मुळे आणि अकाली पांढरे होण्यापासून रोखते.
कडुलिंबाची पाने दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहेत. यामुळे हिरड्यांचा दाह, पोकळी तोंडाची दुर्गंधी दूर होते.