थंडीत कोणते व्हिटामिन्स फायद्याचे, जाणून घ्या

Created By: Atul Kamble

 22 january 2026

 हिवाळ्यात सुर्याचे ऊन्ह कमी आणि थंडी जास्त असते.शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी असते.यावेळी योग्य व्हिटामिन घेणे गरजेचे असते.

व्हिटामिन डी - डॉ.सुभाष गिरी यांच्या मते व्हिटामिन्स डी हाडांना मजबूती देते.इम्युनिटी वाढवते.त्यामुळे थोडावेळ ऊन्हात चालून यावे.अंडी, दूध आणि मशरुमचा आहार घ्यावा.

 व्हिटामिन सी थंडीत रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.संत्री, लिंबू, पेरु आणि हिरव्या भाज्यात ते असल्याने त्या खाव्यात.सर्दी-पडसे होणार नाही.

व्हिटामिन B12 - शरीरात एनर्जी बनवते.मटण, अंडी, पनीर आणि दूधाद्वारे त्याची कमतरता दूर होते.त्यामुळे कमजोरीही कमी होते.

व्हिटामिन ए हे डोळ्यांची नजर वाढवते, त्वचेचे संगोपन करते.गाजर,पपई,पालक आणि रताळ्यात ते असते. त्वचा मृदूमुलायम होते.

व्हिटामिन ई हे थंडीत त्वचेचे रक्षण करते आणि त्वचा मॉश्चराईज करते आणि इम्युनिटी वाढवते.नट्स,सीड्स आणि हिरव्या पालेभाज्यात ते असते.

 व्हिटामिन के हाडांना मजबूत आणि रक्ताचा प्रवाह नीट करते. हिरव्या पालेभाज्या. ब्रोकली आणि सिमला मिरचीत ते भरपूर असते.

गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?