बकरीचे दूध का आहे सुदृढ आरोग्याचा खजाना, 7 कारणे जाणा..

04 ऑक्टोबर 2025

created by : atul kamble

बकरीचे दूध पचायला हलके असते, पोषक तत्वांनी भरपूर असते.

बकरीच्या दूधात छोटे-छोटे फॅट ग्लोब्युल आणि एंजाईम यास पचनास हलके बनवतात.त्यामुळे पोटासाठी ते हलके मानले जाते.गॅस आणि अपचन समस्येपासून सुटका मिळते

या दूधातील आवश्यक पोषक तत्वे आणि एंटीबॉडी शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात. नियमित सेवनाने सर्दी-खोकला सारख्या आजारांपासून सुटका होते.

 अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये बकरीचे दूध वापरले जाते. यातील व्हिटामिन आणि मिनरल त्वचेला हायड्रेटेड आणि ग्लोईंग बनवतात.

 कॅल्शियम आणि फॉस्फोरसने भरपूर बकरीचे दूध हाडांना मजबूत करते. लहानमुलासह ज्येष्ठ लोकांपर्यंत सर्वांसाठी फायदेमंद असते.

वजन कमी करायचे असेल तर बकरीचे दूध फायद्याचे असते. मेटाबॉलिझम वेगाने करते. शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करण्यास मदत करते.

गायीच्या दूधाची एलर्जी असणाऱ्यांना लोकांना बकरीचे दूध एक चांगला पर्याय आहे. यातील खास प्रोटीन एलर्जीच्या शक्यतेला  कमी करते.

बकरीच्या दूधात आढळणारे ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो एसिड मेंदूला शांत करते आणि चांगली झोप येण्यास मदत करते.