'भाऊबीजे'ची कथा

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात, यामागे एक कथा प्रचलित आहे. या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. 

या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवण्यासाठी गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे.

भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळून आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी बहीण प्रार्थना करते.