बाल दिनाचा इतिहास

जगभरात 1925 पासून 'बाल दिन'साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने 20 नोव्हेंबर 1954 ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

 आजही विविध देशांमध्ये 'बाल दिन'च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र 1964 नंतर 14 नोव्हेंबरला 'बाल दिन' साजरा केला जाऊ लागला.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले.

चिमुरड्यांच्या लाडक्या 'चाचा' नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.