कॅविटीवर घरगुती  उपाय

अनेकजण दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या अनियमित वेळापत्रक, यामुळे कॅविटीची समस्या निर्माण होऊ शकते. यासह जेवणानंतर तसेच रात्री झोपेच्या आधी दात स्वच्छ न धुणे हेही कॅविटीचे मुख्य कारण असू शकते. 

दातांच्या कॅविटीपासून मुक्ती मिळण्यासाठी नारळाचे तेल उपयुक्त ठरेल. खोबरेल तेल सुमारे 10 ते 15 मिनिटे फिरवत रहा आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे कॅविटीची समस्या दूर होऊ शकते.

खोबरेल तेल

कॅविटी कमी करण्यासाठी मुलेठीचा वापर गुणकारी आहे. यासाठी मुलेठीचा तुकडा घ्या आणि पावडर बनवा. ही पावडर ब्रशमध्ये लावून दातांवर घासा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

मुलेठी

दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कडूनिंबाचे दातून देखील वापरू शकता. कडूलिंबामुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. हे दातून दररोज ब्रशिंगसाठीही वापरू शकता.

लिंबाचे दातून

लवंगाचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी कापूस वापरून लवंग तेलाचे 2-3 थेंब घाला. हे तेल रात्री दातांवर लावा. हा उपाय नियमित केल्याने कॅविटीची समस्या दूर होईल. 

लवंग तेल

लसणाच्या तेलाचा वापरही दातांची कॅविटी काढण्यासाठी केला जाऊ शकतो. लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या बारीक करून त्या कॅविटीच्या भागात लावा. 10 ते 15 मिनिटांनंतर दात स्वच्छ धुवा.

लसूण