होळीचे रंग  चेहरा -केसात  अडकलेत?

त्वचेवरुन रंग  काढण्यासाठी गरम पाण्याऐवजी थंड  पाण्याचा वापर करा

रंगपंचमी खेळून झाल्यानंतर केसांना  शॅम्पू न लावता  दही किंवा अंड्यातील पांढरा भाग लावा.  त्यानंतर तासाभराने केस धुवा. 

 जर केसांना अंड किंवा दही लावायचे  नसेल तर केसांना    नारळाच्या दूधाने धुवा.  त्यानंतर शॅम्पू लावा.

चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी गव्हाच्या पीठात तेल किंवा लिंबाचा रस मिसळून पातळ पेस्ट करा. ही पेस्ट अंघोळीपूर्वी आपल्या त्वचेवर लावा.

केसावरील रंग काढण्यासाठी  केस किंवा चेहरा  सतत धुवू नका.

 चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी  नारळाच्या तेलाचा  वापर करा.

 रंग काढण्यासाठी फेशियल  किंवा ब्लीच  करु नका.

मानेवरील किंवा  हाताचा रंग  काढण्यासाठी बेसन,  दही आणि हळदीची एकत्र पेस्ट लावा.

  जर सिल्व्हर आणि गोल्डन रंग  लागले असतील तर  स्वच्छ पाण्याने  चेहरा धुवा.

नखांवर लागलेला  रंग काढण्यासाठी टूथपेस्टचा  वापर करा.