कपड्यांवरील डाग असे काढा

साडीवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी. एक दिवस तसेच ठेवावे नंतर धुवावे.

शाईचा डाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे व मग डाग धुवून टाकावा.

कपड्यांवरचे हळदीचे डाग घालवण्यासाठी व्हिनेगर अथवा लिंबू लावा.

कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी आणि ती सुकल्यावर कपडे डिटर्जंटने धुवा.

सायकल ऑईलचे डाग निलगिरी तेलाने निघतात.