घरात हे 6 वास्तूदोष असतील तर आताच व्हा सावध! अन्यथा...

25 April 2024

Created By: Rakesh Thakur

तुम्ही मेहनत करून चांगली कमाई करूनही हाती पैसा टिकत नसेल. घरात आर्थिक स्थिती खराब असेल. तर वास्तुशास्त्रात यासाठी 6 दोष सांगितले गेले आहेत.

घराचं मुख्य द्वार दक्षिण दिशेला असल्यास आर्थिक स्थिती नाजूक होते. तसेच घरात दरिद्रता येते. 

घराच्या द्वारावर झाडाची सावली पडणं किंवा घरासमोर खांब असल्यास आर्थिक स्थिती नाजूक होते. त्यामुळे कायम पैशांची चणचण भासते. 

घरात गळके नळ असले की आर्थिक फटका बसतो. नळातून जसं पाणी पडतं तसं आर्थिक नुकसान वाढत जातं. 

घरातील भिंतींना भेगा गेल्या नकारात्मक उर्जेता वावर होतो. त्यामुळे वेळीच या भेगा भरून काढल्या पाहीजेत. 

घराचा मुख्य दरवाजा किंवा गेट खोलताना कर्णकर्कश आवाज होता कामा नये. अन्यथा आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं. 

घराच्या मुख्य दरवाज्याला उंबरठा नसतो त्या घराची कधीच प्रगती होत नाही. आर्थिक स्थिती खराब होते.