स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व

स्वातंत्र्य दिवस हा भारतासाठी विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट इ.स. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे.

या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.

देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.