नागपंचमी प्रथा आणि परंपरा

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी.

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते.

नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावनेतून हा सण पाळण्याची परंपरा आहे.

या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.

वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

नागपंचमीबाबत वेगवेगळ्या समाजात अनेक प्रथा, परंपरा प्रचलित आहेत.

या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.

स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागिण आणि पिल्लांची चित्रे काढतात.

या चित्राला दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करण्याची परंपरा आहे.

या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.