अननसातील पोषक तत्वे आरोग्यास उपयुक्त

अननस खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अननसच्या सेवनामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. अननसामध्ये भरपूर प्रमाणात पोषण घटक असतात. 

अननसमध्ये पुष्कळ पोषक घटक आणि एन्झाईम्स असतात. अननस खाल्याने चयापचय वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी अननसाचा आहारात समावेश करा. 

अननसमधील पोषक घटक

अननस आपल्या पोटासाठी चांगले आहे. हे फायबरने समृद्ध आहे आणि म्हणून पचन करण्यास मदत होते. आपण आपले पाचन आरोग्य सुधारण्यासाठी अननसचे सेवन करू शकता.

फायबरचा चांगला स्रोत

अननसची चव आंबट असते. मात्र, अननस खाल्याने बराच वेळ भूक लागत नाही. ज्यावेळी आपल्याला भूक लागल्यासारखी वाटते, अशावेळी आपण अननस खाणे उपयोगी ठरेल.

कमी कॅलरी

वृद्धावस्थेत संधिवात एक सामान्य समस्या आहे. यावेळी सांधे सुजतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे जळजळ आणि संधिवात असलेल्या लोकांना वेदनांपासून आराम मिळतो.

संधिवात

अननसमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक आहेत. व्हिटॅमिन-सी फ्लूपासून आपले संरक्षण करते.

'व्हिटॅमिन-सी'चा स्त्रोत

अननस कॅल्शियम आणि मॅंगनीज यासह अनेक पोषक द्रव्यांचा समृद्ध स्त्रोत आहे. हे पोषक ऑस्टिओपोरोसिस रोखण्यास मदत करतात यामुळे हाडे मजबूत होतात.

हाडांसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन-सी आणि बीटा कॅरोटीन समृद्ध असलेले हे फळ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. आपण ते खाऊ शकता किंवा त्वचेवर थेट लावू शकता.

त्वचा