'हे' करा पावसाळ्यातही आजार दूर ठेवा

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यादरम्यान, अनेकदा अन्न विषबाधा, अतिसार, संसर्ग, सर्दी आणि फ्लू यापासून होणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी पोषकतत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे. हे पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटीवायरल, अँटीफंगल, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, प्रतिजैविक तसेच इतर गुणधर्म असतात. याची आपल्याला निरोगी ठेवण्यास आणि संक्रमणास प्रतिकार करण्यास मदत करतात. आपण हळदीचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. झोपण्यापूर्वी दूधात हळद मिसळून प्या.

हळद

आपल्या आहारात दही, ताक, लोणचेयुक्त भाज्या यासारख्या प्रोबायोटिक्स आणि फर्मेण्टेड म्हणजेच आंबवलेल्या पदार्थांचा समावेश करावा. प्रोबायोटिक्स एक चांगला बॅक्टेरिया आहे, जो आपल्या पोटात किंवा आतड्यांमध्ये राहतो. आपल्या शरीरात वाढणाऱ्या आणि रोगांना कारणीभूत असलेल्या जंतूंचा नाश करतात.

प्रोबायोटिक्स, फर्मेण्टेड फूड्स

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. आपल्या प्रतिकारशक्तीसाठी हे खूप चांगले आहे. हे संक्रमणाविरूद्ध लढते तसेच पचन सुलभ करते. हाडे मजबूत करते. हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. लिंबू उत्तेजकदेखील आहे. आपल्या पावसाळी आहारात अर्थात अन्नावर लिंबू पिळून खा.

लिंबू

आले, लवंग, दालचिनी, वेलची, तुळशीची पाने आणि कोरडी मिरपूड असे मसाल्याचे पदार्थ चहाची पाने आणि दुधाच्या योग्य प्रमाणात उकळून घ्या. हा मसाला चहा नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढविण्यास फार मौलिक स्वरुपाची मदत करतो. वेलची आणि लवंग बऱ्याच संक्रमणाविरूद्ध प्रभावी आहेत. 

मसाला चहा

लसूणचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य करते. विविध अभ्यासांनुसार, नियमितपणे लसूण खाल्ल्याने रक्तातील टी-सेल्सची संख्या वाढते. यामुळे सर्दी आणि फ्लूसारख्या विषाणूजन्य संक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करण्यात मदत होते.

लसूण