3 september 2025
Created By: Atul Kamble
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे निवासस्थान व्हाईटहाऊस चर्चेत आहे.व्हाईट हाऊसच्या खिडकीतून काळी बॅग फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावरील व्हिडीओत व्हाईट हाऊसच्या खिडकीतून काळ्या रंगाची बॅग फेकताना कोणीतरी दिसत आहे
या व्हिडीओबाबत जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना छेडले तेव्हा तो एआय जनरेटेड व्हिडीओ असावा असे ते म्हणाले
तसेच व्हाईट हाऊसची खिडकी उघडणे सोपी गोष्ट नाही असेही ते म्हणाले
प्रेसने त्यांना हा व्हिडीओ दाखवला तेव्हा ते म्हणाले की माझ्या पत्नीनेही एकदा हवा येण्यासाठी खिडकी उघडण्यास सांगितले होते
परंतू व्हाईट हाऊसच्या खिडक्या कधी उघडल्या जात नाहीत. कारण त्या ६ हजार पाऊंड वजनाच्या आहेत
तसेच व्हाईट हाऊसची खिडकी बुलेटप्रुफ देखील आहे. सुरक्षेसाठी देखील त्या उघडल्या जात नाहीत.