15 August 2025

Created By: Atul Kamble

या देशात पाऊल ठेवू शकत नाहीत पाकिस्तानी, पासपोर्टवरच स्पष्ट लिहीलंय 

22 August 2025

Created By: Atul Kamble

पाकच्या पासपोर्टवर लिहीलंय 'Not valid for Israel'म्हणजे या पासपोर्टने इस्राईलमध्ये प्रवेश करु शकत नाही

 इस्राईल वगळता या पासपोर्टने पाक नागरिक जगातील कोणत्याही देशात जाऊ शकतो

पाकिस्तानने त्यांच्या पासपोर्टवर अशी अट का टाकली आहे हे पाहूयात

वास्तविक इस्राईलचे पाकिस्तानशी कोणतेही राजनैतिक वा व्यावसायिक संबंध नाहीत.

पाकिस्तानी पासपोर्टवर लिहिलंय की तो इस्राईलच्या प्रवासासाठी मान्यता देत नाही,कारण पाकिस्तानने इस्राईलला अधिकृत राष्ट्र म्हणून परवानगी दिलेली नाही

हे धोरण पाकचे पॅलेस्टाईन आंदोलनाला प्रबळ समर्थन आणि अन्य मुस्लीम देशांशी त्यांच्या आघाडीचे फलित आहे ज्यांनी इस्राईलला मान्यता दिलेली नाही

पाकिस्तान इस्राईलला देश म्हणून मानत नाही. युनोतही पाकिस्तान नेहमी इस्राईल विरोधात पॅलेस्टाईनच्या बाजूने मत देतो

 पाकिस्तान सरकार आणि जनता बऱ्याच काळापासून इस्राईलच्या ताब्यातील पॅलेस्टाईन जमीन आणि जेरुसलेमची स्थितीच्या विरोधात आहे.

 त्यामुळे कारणाने पाकिस्तानी नागरिकांना इस्राईलच्या प्रवासासाठी अधिकृतपणे बंदी आहे