अमेरिकेला जापानमधून कोणत्या वस्तूंची गरज भासते? संपूर्ण यादी एका क्लिकवर

6 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

अमेरिकेने अनेक देशांवर टॅरिफ लादला आहे. जापानवरीही 25 टक्के कर लादला होता. पण आता 15 टक्क्यांवर आणला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-जापान व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. यानुसार 10 टक्क्यांची कपात केली आहे. 

अमेरिका जापानमधून अनेक वस्तू आयात करते. यात वाहने, ऑटोमोबाईल्स, ऑटो पार्ट्स, मिशनरी, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने आणि औषध उत्पादनांचा समावेश आहे. 

अमेरिका जापानमधून प्लास्टिक, रबर, चामड्याच्या वस्तू आयात करते. तर जापान अमेरिकेतून काय आयात करते ते जाणून घेऊयात.

जापान अमेरिकेतून अनेक वस्तू आयात करते. यात शेतीशी संबंधित वस्तू, खनिज इंधनांचा समावेश आहे.

जापान अमेरिकेतून रसायन, औषधं, यंत्रसामग्री-उपकरणे, पोल्ट्री उत्पादने आणि विमाने खरेदी करते.

जापानने अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यासोबतचं अमेरिकेतून शेती, संरक्षण आणि विमान उत्पादने खरेदी करेल. 

आशिया कप स्पर्धेपूर्वी गोलंदाजाने रचला इतिहास, केलं असं की...