कोलकात्याच्या पराभवानंतर शाहरुख खानचा चेहरा पडला

 17 April 2024

Created By: Rakesh Thakur

कोलकात्याने 224 धावांचं आव्हान राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूवर 2 गडी राखून पूर्ण केलं

पराभवाचं शल्य कोलकात्याचा मालक शाहरुख खानच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं. इतका मोठा स्कोअर डिफेंड करण्यात संघ अपयश ठरला.

पराभवानंतरही शाहरुख खानने खेळ भावनेचं दर्शन घडवलं आणि बटलर मिठी मारून शुभेच्छा दिल्या.

शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये घेला आणि संघातील खेळाडूंशी चर्चा केली. त्याने सांगितलं की, "पराभव व्हायला नको होता, कारण सर्वांनी चांगलं खेळलं होतं."

"खेळात असं होत असतं. प्रत्येक दिवस आपला नसतो. त्यामुळे उदास होण्याची गरज नाही. तुमची एनर्जी आणि आत्मविश्वास तसाच दिसला पाहीजे. जसं की विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये येतो."

उदास होण्याची गरज नाही, आपण पुन्हा झेप घेऊ असं गौतम गंभीरने सांगितलं. 

शाहरुख खानने टीमला गुड लक सांगितलं आणि आतापर्यंतच्या कामगिरीसाठी आभारही व्यक्त केले.