आयपीएलच्या 13 सामन्यात फेल आणि आता पंजाबने सोपवली कर्णधारपदाची धुरा
18 मे 2024
Created By : राकेश ठाकुर
पंजाब किंग्ससाठी आणखी एक आयपीएल स्पर्धा निराशाजनक गेली. सलग 10 वर्षे टीम प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकली नाही.
पंजाब किंग्स 10 गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आता साखळी फेरीतील शेवटचा सामना शिल्लक राहिला आहे.
19 मे रोजी होणाऱ्या सामन्यासाठी पंजाबने विकेटकीपर फलंदाज जितेश शर्माकडे कर्णधारपद सोपवलं आहे.
पंजाब किंग्सचा नियमित कर्णधार शिखर धवन अजूनही फिट नाही. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार नाही.
शिखर धवनच्या गैरहजेरीत पंजाबचं नेतृत्व सॅम करन करत होता. पण शेवटच्या सामन्यापूर्वी इंग्लंडला परतला आहे.
जितेश शर्माने मागच्या पर्वात चांगली कामगिरी केली होती. पण या पर्वात त्याने 13 सामन्यात एकूण 155 धावा केल्या.
पंजाब किंग्स या स्पर्धेचा शेवट गोड करून निरोप घेण्याच्या तयारीत आहे. या सामन्यात विजय मिळवला तर 8व्या स्थानी राहील.