आयपीएलमध्ये आठ वर्षानंतर आरसीबी अंतिम सामना खेळणार?

13 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

दोन आठवड्यापूर्वी आरसीबीने 8 पैकी 7 सामने गमावले होते. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत परतेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. 

आरसीबीने सर्वांची तोंड बंद केली आहेत. दिल्लीला पराभूत करत सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

आरसीबीचं प्लेऑफचं गणित 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून आहे. 

आरसीबीचं लक्ष प्लेऑफवरच नाही तर फायनलवरही आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. 

आरसीबीला नशिबाने साथ दिली तर 8 वर्षांनी संघ अंतिम फेरी गाठेल.

आरसीबीने सलग पाच सामने जिंकले आहेत. यापूर्वी एका मोसमात 5 किंवा त्यापेक्षा जास्त सामने तीनवेळा जिंकले होते.

आरसीबीने 2009, 2011 आणि 2016 मध्ये सलग 5 किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकले होते. आता आरसीबीने ही कामगिरी चौथ्यांदा केली आहे.