सात वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर, आता विराट कोहलीवर साधला निशाणा
26 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
करुण नायर 7 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 मध्ये खेळला होता.
करुण नायरने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली कसोटीत पदार्पण केलं होतं. पहिल्या कसोटीत 303 धावा केल्या होत्या.
करुण नायर विरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक ठोकणारा दुसरा फलंदाज आहे. तर पहिल्याच कसोटी त्रिशतक ठोकणारा तिसरा फलंदाज आहे.
करुण नायर त्रिशतक ठोकल्यानंतर टीम इंडियासाठी फक्त तीन सामने खेळला. काही डाव खेळल्यानंतर संघातून बाहेर गेला.
करुण नायर कर्नाटक देशांतर्गत महाराजा ट्रॉफी टी20 लीगमध्ये खेळत आहे. यात त्याने 190 च्या स्ट्राईक रेटने 346 धावा केल्या.
भारतात देशांतर्गक क्रिकेटचा नवं पर्व सुरु होणार आहे. यापूर्वी तो संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
नायरने नाव घेता विराट कोहलीवर निशाणा साधला. गेल्या मोसमान 300 धावा न करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. कारण प्रत्येकजण इंग्लंडच्या खेळीबद्दल बोलू लागतो.