काव्या मारनचे वडील ॲक्शन मोडमध्ये, आता वसूल करणार 1300 कोटी

27 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला. याचं दु:ख काव्याच्या चेहऱ्याव स्पष्ट दिसलं.

पराभवाच्या एक दिवसानंतर काव्याचे वडील कलानिधी मारन मात्र ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. 

कलानिधी मारन यांनी स्पाईसजेट आणि त्यांचे प्रमुख अजय सिंग यांच्याकडून 1323 कोटीहून अधिक नुकसान भरपाई मागितली आहे.

या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशालाही त्यांनी आव्हान देण्याचं ठरवलं आहे.

कोर्टाने आदेशात व्याजासह मारन यांना 579 कोटी रुपये परत करण्यास सांगितलं होतं.

मारन यांनी कायदेशीर सल्लामसलत केल्यानंतर या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

केएएल एअरवेज आणि मारन यांचा असा विश्वास आहे की वरील निर्णय सदोष आहे आणि पुढील तपासाची गरज आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान आणि नुकसानीचा दावा या दोन्हींचा पाठपुरावा करून या निकालाची अपेक्षा आहे.