20 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
आयुर्वेदात तुपाचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. पण काही जणांना तूप खाणं आवडत नाही. पण तूप आरोग्यासाठी चांगलं असल्याचं म्हंटलं जातं.
तूप शरीरासाठी खूप आवश्यक आहे. यात पोषक तत्त्व आहेत. तसेच तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने आरोग्य समस्या उद्भवत नाहीत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आरोग्यासाठी चांगले असल्याचं म्हंटलं जातं.
आहारात तूपाचा समावेश केल्याने पोट निरोगी राहतं. तसेच पचनक्रियाही सुधारते.
तूप हे ब्युटीरिक एसिडने समृद्ध आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तूप खाल्ल्याने त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते.
तुपातील व्हिटॅमिन के कॅल्शियम शोषण वाढवते. त्यामुळे हाडांची ताकद वाढण्यास मदत होते. हाडांना बळकटी मिळते.