51 कोटी कमवले, आता लखनौमधून होणार पत्ता कट? 

9 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

सनरायझर्स हैदराबादने लखनौला 10 गडी राखून पराभूत केलं. आता केएल राहुलचं कर्णधारपद अडचणीत आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, केएल राहुलचं भविष्य अंधारात आहे. त्याला संघातून रिलीज करण्याची शक्यता आहे. 

केएल राहुलला या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात कर्णधार मिळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत खरं काय ते स्पष्ट नाही. 

हैदराबादने पराभूत केल्यानंतर संजीव गोयंका यांनी केएल राहुलशी संवाद साधला. यावेळी ते आक्रमक दिसत होते.

महेंद्रसिंह धोनी एका सिझनमध्ये अकार्यक्षम ठरल्यानंतर त्यालाही कर्णधारपदावरून दूर केलं होतं. असं राहुलसोबत होऊ शकतं.

केएल राहुल 2022 ला लखनौचा कर्णधार झाला होता. त्याचा पगार 17 कोटी आहे. म्हणजेच 3 पर्वात 51 कोटी कमवले.

पुढच्या सिझनआधी मेगा ऑक्शन आहे. लखनौ संघ केएल राहुलला रिलीज करू शकतो.