कोपर काळपट असेल तर हातांचे सौंदर्य बिघडू शकते. मात्र काही उपायांनी तुम्ही हा काळसरपणा दूर करू शकता.

कोपरांचा काळेपणा घालवण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. नॅचरल ब्लिचींग एजंट असलेलेल लिंबू त्वचेवरील मळ सहज हटवतो.

काळेपणा हटवण्यासाठी लिंबाचा रस प्रभावित जागी लावून दहा मिनिटांनी धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.

काळसरपणा घालवण्यासाठी खोबरेल तेलही उपयुक्त ठरते. त्वचेवर तेल लावून एक तास ठेवा नंतर पाण्याने धुवा.

दूध व हळदीचे मिश्रणही काळसरपणा घालवण्यासाठी फायद्याचे ठरते. हे मिश्रण 15-20 मिनिटे लावून नंतर स्वच्छ धुवावे.

कोरफडीच्या रसानेही कोपरांचा काळेपणा दूर होतो. कोरफडीचा रस प्रभावित जागी लावून अर्ध्या तासाने धुवून टाकावे.