पोषक तत्वांची कमतरता, तोंडाची नीट सफाई न करणे यामुळे तोंडात फोड येऊ शकतात.

तोंडात फोड येणे हे फार वेदनादायक ठरू शकते. त्याची कारणे समजून घेऊया.

खाताना गाल वा जीभ चावली गेल्यास जखम होऊन फोड येऊ शकतो.

मौखिक आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिल्यास बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकते. तोंड येण्याचे सर्वात सामान्य कारण आहे.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे जीभ व गालाच्या आतल्या भागात जखम होऊन तोंड येऊ शकते.

संत्र, अननस, चिंच, स्ट्रॉबेरीसारखे ॲसिडीक पदार्थ खाल्ल्याने तोंड येण्याची समस्या उद्भवते.

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या हार्मोनल परिवर्तनामुळेही तोंड येण्याचा त्रास होऊ शकतो.

खराब ओरल हेल्थमुळे तोंडात व्हायरल, बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकते, जे तोंड येण्याचे प्रमुख कारण ठरू शकते.