आपल्यापैकी बहुतांश लोकं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा नियमितपणे वापर करतात.

पण त्यापैकी खूप कमी लोकांना की-बोर्डवरील की-बोर्डच्या F आणि J बटणावर असलेल्या डॅश (-) या खुणेबद्दल माहीत असते.

नीट निरीक्षण केलेत तर तुम्हाला दिसेल की F आणि J या बटणावर असलेली ही खूण थोडी उभट असते.

की-बोर्डवर असलेल्या या डॅशचा शोध जून ई बॉटिच यांनी  2002 साली लावला होता.

2002 नंतर बहुतेक सर्व मॉडर्न की-बोर्ड मॉडेलवर F आणि J बटनांवर डॅश (-) देण्यास सुरूवात झाली.

एका रिपोर्टनुसार, F आणि J बटनांवर डॅश यासाठी देतात, जेणेकरून आपण टाईप करताना खाली न बघता योग्य बटण ओळखू शकू.

उदा. - तुम्ही की-बोर्डवर न पाहता टाइप करत असाल तर डॅश ला बोट लागल्यावर कुठलं बटन कुठे आहे, हे समजू शकेल. 

(F आणि J) या दोन्ही बटणांवरील डॅशचा समतोल साधत योग्य वापर केल्यास टायपिंगचा स्पीड वाढतो आणि की-बोर्डचा वापरही सोपा होतो.

असा करा वापर - सर्वप्रथम तुमच्या डाव्या व उजव्या हाताची तर्जनी F आणि J बटनांवर ठेवावी.

यामुळे डावा हात A S D आणि F तर उजवा हात  J K L आणि कोलन बटण कव्हर करतो. दोन्ही अंगठे  स्पेसवर ठेवावेत.