कॉफी शरीरासाठी फायदेशीर तर असते. पण अयोग्य वेळी व अयोग्य प्रमाणात त्याचे सेवन केल्यास नुकसानही खूप होते.

हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर रात्रीच्या वेळेस कॉफी पिणे हानिकारक ठरते. रात्री कॉफी प्यायल्याने बीपी वाढू शकते.

रात्री कॉफी प्यायल्याने तुम्हाला उत्साही वाटू शकते, पण त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. गॅस व ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

रात्री कॉफी प्यायल्यामुळे झोप न येण्याचा म्हणजेच निद्रानाशाचा त्रास होतो. कॉफीमधील कॅफेनमुळे झोप कमी होते.

कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण खूप असते. रात्री त्याचे सेवन केल्याने हाडं कमकुवत होतात. कॉफीच्या अतिसेवनाने ऑस्टिओपोरोसिसही होऊ शकतो.

रात्री कॉफी प्यायली तर निद्रानाशाचा त्रास होतो, ज्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊन त्वचेवर पिंपल्स, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन इत्यादी समस्या उद्बवतात.

म्हणूनच रात्रीच्या वेळेस कॉफीचे अधिक सेवन करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक मानले जाते.