फळं खाण्याचे आपल्या आरोग्याला खूप फायदे मिळतात. पण रात्री फळं खाल्ली तर नुकसान होऊ शकते. 

रात्री फळं खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

केळं, आंबा यामध्ये खूप कॅलरी असतात. नियमितपणे रात्री फळं खाल्ल्यास वजन वाढू शकते.

या सवयीमुळे झोपही प्रभावित होऊ शकते. फळ खाल्ल्याने एनर्जी लेव्हल वाढते, त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

रात्री फळं खाण्याच्या सवयीमुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.

काही फळांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. रात्री फळं खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते, व मधुमेहाचा धोका संभवतो.

रात्री जेवल्यावर लगेच फळं खाल्ली तर पाचन तंत्र प्रभावित होऊ शकते. त्यामुळे गॅसेस, अपचन, ॲसिडिटी असा त्रास होऊ शकतो.