जगात काही ठिकाणी रहस्यमयी खजिने आहेत. हे खजिने मिळाल्यावर त्या देशातील परिस्थिती बदलणार आहे.
15 February 2025
जगातील हे खजिने मिळवण्यासाठी अनेकांनी आपले प्राणसुद्धा गमावले आहे. परंतु ती संपत्ती मिळू शकली नाही.
काहुएंगा दर्रा हे स्थान रहस्यमयी खजिनासाठी ओळखले जाते. हा खजिना अजून कोणालाच मिळाला नाही. पण त्यासाठी अनेकांचा मृत्यू झाला आहे.
एल डोराडो हा खजिना कोलंबियाच्या ग्वाटाविटा सरोवरात दडला असल्याचे म्हटले जाते. तो मिळवण्याच्या प्रयत्नात अनेकांना जीव गमवावा लागल्याचे सांगितले जाते.
लीओन ट्राबुको याच्याकडे 16 टन अवैध सोने होते. जे ट्राबुकोने अशा ठिकाणी लपवले होते की ते आजपर्यंत कोणालाही सापडलेले नाही.
अपाचेचा खजिना विंचेस्टर माऊंटनमध्ये आहे. या खजिन्याच्या शोधात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ज्याने तो मिळवण्याचा प्रयत्न केला तो मारला गेला.
चार्ल्स आयलॅडचा खजिना 1721 पासून आहे. नाविकांनी मेक्सिकोच्या सम्राट ग्वाझमोझिनची सर्व मालमत्ता चोरली आणि ती येथे लपवली. परंतु हा खजिना जो कोणी शोधण्याचा प्रयत्न केला त्याचा मृत्यू झाला.