Chankya Niti : आई-वडिलांनी मुलांसमोर कधीच या गोष्टी करू नयेत...

29 August 2024

Created By : Manasi Mande

आचार्य चाणक्य यांना देशातील मोठे अर्थशास्त्रज्ञ आणि विद्वान मानले जाते. आयुष्यात यशस्वी  होण्यासाठी त्यांनी काही नियम सांगितले आहेत.

आई-वडिलांनी मुलांसमोर काही गोष्टी करू नयेत, असे त्यांनी सांगितले.

मुलांसमोर विचार करून बोलले पाहिजे. रागावून, ओरडून बोलू नये.

अहंकार, द्वेष, राग , अपमान करणे अशा सवयींमुळे मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

 मुलांसमोर आई-वडिलांनी कधीच एकमेकांचा अपमान करू नये, अन्यथा त्यांच्यावर चुकीचे संस्कार होऊ शकतात.

मुलांसमोर पालकांनी कधीच खोटं बोलू नये. अशाने मुलांच्या मनात आई-वडिलांबद्दलचा आदर कमी होतो.

अन्यथा मुलांना खोटं बोलण्याची सवय लागू शकते.

मुलांसमोर कोणत्याही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ नका. त्यांना योग्य आणि अयोग्य यातला फरक शिकवला पाहिजे.