मॉन्सूनमध्ये पावसाची मजा घेत गरम चहाचे घोट घेण्याची मजा शब्दात सांगता येत नाही
पावसात हवेत आद्रता असल्याने इन्फेक्शन होतात, चहात लवंग घातल्यास तुमचे आरोग्य चांगले होईल
पावसात सर्दी,खोकला, बंद नाक असेल तर चहात लवंग टाकल्याने युजेनॉल नावाचे कपाऊंडमुळे छाती आणि नाक साफ होते
याने गळ्याची खवखव,सायनसचे दुखण कमी होते. लवंग चहाने पावसात श्वास मोकळा होऊन दिलासा मिळतो
पावसात पोटात जीवाणू-विषाणूने पोटात इन्फेक्शन होते. लवंगात एंटीबॅक्टीरिअल, एंटीव्हायरल आणि एंटीफंगल गुण असतात त्यामुळे लवंग चहाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते
पावसात तेलकट पदार्थ पोट खराब करु शकतात, लवंग पाचक रस बनवण्यात मदत करते
लवंग गॅस कमी करते आणि पोटाला आराम देते.चहात लवंग टाकून पिल्याने हलके वाटते.पोटफुगी, अपचन समस्या दूर होते
मान्सून शरीरात बुरशी तयार करु शकतो.लवंट शरीरास डिटॉक्स करुन त्वचा आणि शरीरास फंगल इन्फेक्शन पासून वाचवते
लवंग छोटी असून कमी वापरली तरी फायदे जास्त आहेत. चहात रोज एक लवंग टाकल्याने चहाचा स्वाद वाढलेच पण हेल्थही चांगली होईल.