मखाना पौष्टीक खाद्य पदार्थ आहे. मखाना म्हणजे कमळाचे बीज याला जगभरात मखानाच म्हटले जाते.

4 May 2025

Created By: Jitendra Zavar

मखान्यामध्ये फायबर, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, जस्त, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक असतात. 

मखान्यातील घटक रक्तातील साखर नियंत्रित करण्यापासून ते आरोग्यापर्यंत अनेक बाबींसाठी फायदेशीर आहे. शूगर असलेल्या रुग्णांसाठी मखाने खाणे आरोग्यदायी आहे. 

शूगर असलेल्या रुग्णांनी नियमित माखान्यांचा समावेश डायटमध्ये केल्यावर रक्तातील साखर वाढत नाही. 

मखानामध्ये कॅलरीज कमी असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यात भरपूर फायबर असते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 

शूगर कंट्रोल करण्यासाठी रोज सकाळी उपाशी पोटी मखाने खाल्ले पाहिजे. तसेच मुबलक प्रमाणात पाणी घेतले पाहिजे. 

दिवसा कुरकुरीत स्नॅक्स खाण्याची सवय असेल तर भाजलेले मखाने खाल्ले तर रक्तातील साखर वाढणार नाही. यामुळे स्नॅक्समध्ये मखान्यांचा समावेश करता येईल. 

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असणे ही देखील एक गंभीर समस्या आहे. अशा वेळी रुग्णाला आरामात बसवावे. ग्लुकोजच्या गोळ्या किंवा फळांचा रस द्यावा आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.