कोणत्या शहरादरम्यान धावली देशाची पहिली सुपरफास्ट ट्रेन 

1 March 2024

Created By : Atul Kamble 

सध्या वंदेभारत देशाची सर्वात वेगवान ट्रेन आहे, परंतू पहिली सुपरफास्ट ट्रेन केव्हा धावली

स्वातंत्र्यापूर्वी रेल्वेचे जाळे पसरलेले होते. परंतू देशात सुपरफास्ट ट्रेन नव्हती 

याची कमतरता दूर करण्यासाठी 1 मार्च 1969 रोजी राजधानी एक्सप्रेस सुरु झाली 

राजधानी एक्सप्रेस देशाची पहिली सुपरफास्ट ट्रेन आहे. दिल्ली आणि कोलकाता दरम्यान ती सुरु झाली

या ट्रेनचे उद्देश्य देशातील महत्वाच्या भागांना राजधानी दिल्लीशी जोडणे, म्हणून तिचे नाव राजधानी एक्सप्रेस पडले.

सुरुवातीला या ट्रेनला 2 पॉवर कार, 5 एसी चेअरकार, 1 एसी डायनिंग कार आणि 1 फर्स्ट एसी क्लास असे डबे होते

तत्कालिन रेल्वेमंत्री राम सुभाग सिंह यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. ट्रेनचा वेग प्रती तास 120 किमी होता

राजधानी एक्सप्रेसला 1972 मध्ये मुंबईशी जोडले गेले. तेव्हापासून राजधानीची संख्या वाढत आहे