काच तुटणं :  शुभ संकेत की अशुभ चेतावणी ?

19 August 2025 

Created By : Manasi Mande

काच तुटणं हे शुभ आणि अशुभ दोन्ही मानलं जातं. ते कधी शुभ आणि कधी अशुभ असतं ते जाणून घेऊया.

वास्तूशास्त्रानुसार, काच तुटणं शुभ असतं,  त्याने येणारं संकट दूर होतं असं म्हणतात.

तसंच काच तुटल्यास घरातील जुने वाद मिटतात असंही म्हटलं जातं.

पण ज्योतिषशास्त्रानुसार, काच तुटणं अशुभ असतं. चांगल्या प्रसंगी काच तुटली तर तो अपशकुन मानला जातो.

काच तुटणं शुभ, पण तुटलेल्या काचा घरात ठेवणं किंवा त्यात चेहरा पाहणं  अशुभ मानलं जातं. त्यामुळे नकारात्मक शक्तिचा प्रवेश होतो असं मानतात.

काच तुटल्यास ती लगेच पांढऱ्या कापडात गोळा करून बाहेर फेकावी असं म्हणतात. तुटलेल्या काचा घरात ठेवू नयेत.

तुटलेल्या काचा जोडून आजकाल एखादं शोपीस तयार केलं जातं, पण ते वास्तूनुसार, निगेटीव्ह मानलं जातं.