सध्या जिमला जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परंतू जिममध्ये हळूहळू आपली व्यायामाची क्षमता वाढवावी, अचानक जास्त हार्ड एक्सरसाईज करणे धोकादायक ठरु शकते.
अचानक वेगाने एक्सरसाईज केल्याने किंवा जास्त परिश्रम घेतल्याने धमन्यांवर दाब येतो.ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
जर आधी पासूनच शरीरात हाय कोलेस्ट्रॉल असेल किंवा धमन्याच्या आत घाण प्लॅक असेल तर अचानक हार्ड काम केल्याने प्लॅकचे विघटन होते आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.
कोरोना संक्रमणानंतर धमन्यात इंफ्लेमेशन आणि घाणेरडे कोलेस्ट्रॉल चिकटण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे लोकांनी सावध रहावे.
जिम वा रनिंगची सुरुवात करताना पहिल्याच दिवशी क्षमते पेक्षा अधिक व्यायाम करण्यापासून दूर रहावे असे कार्डिओलॉजिस्ट डॉ. नित्यानंद त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
जेव्हा जिमला जाल तेव्हा हळूहळू क्षमता वाढवावी, पहिल्या दिवशी दहा मिनिटे हलका व्यायाम, नंतर हळूहळू क्षमता वाढवत न्यावी.