तुम्ही कधी विचार  केलाय का? विमानाचा  रंग पांढराच का असतो?

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

लहानपणापासून आपण आकाशात विमान बघतो

पण कधी विचार केला आहे का? आकाशातील विमानाचा रंग पांढराच का असतो?

पांढरा रंग हा विमानाचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतो.

पांढरा रंग विमानाला असल्याने विमानात थंडावा राहतो. कारण पांढरा रंग उष्णता नष्ट करतो

पांढऱ्या रंगामुळे विमानातील कोणत्याही प्रकारची क्रॅक सहज ओळखता येते. 

 अहवालानुसार, पक्षी इतर रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचे विमान सहजपणे पाहू शकतात

पक्षांना विमान दिसल्याने पक्षी विमानाला धडकण्याची शक्यता कमी होते