तुमच्याकडे असलेल्या 10 रुपयाच्या नोटेवर स्टार आहे का?

27 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

दहा रुपयाच्या नोटेवर असलेलं स्टार चिन्ह सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. काही लोकांच्या मते ही विशेष नोट आहे. 

सोशल मीडियावर काही लोक ही फेक नोट असल्याचं देखील सांगत आहे. पण याबाबतचं स्पष्टीकरण खुद्द आरबीआयने दिलं आहे. 

आरसीबीआयने सांगितलं की, नोटांच्या नंबरमध्ये दिसणारा स्टार हा काही  खास नोटांच्या मध्ये आहे. 

जर नोटांच्या मध्ये स्टार असेल तर त्याचा अर्थ असा की, ही नोट रिप्लेस किंवा रिप्रिंट केली आहे.

भारतीय नोटांच्या नंबरमध्ये स्टार चिन्ह दिसल्यास समजून जा की ही नोट डिफेक्ट असल्याने पुन्हा प्रिंट केली आहे.

स्टार सीरिज असलेल्या नोटा इतर नोटांसारख्याच आहेत. ही काय स्पेशल नोट नाही. तसेच देवाणघेवाण करण्यात अडचण नाही.

त्यामुळे या नोटेबाबत जे काही अफवा किंवा चर्चा रंगल्या आहेत, त्याबाबत आरबीआयने स्पष्टीकरण दिल्याने पूर्णविराम लागला आहे.

सकाळी रिकाम्या पोटी पुदीन उकळून पाणी प्यायल्याने काय होतं?