19 september 2025
Created By: Atul Kamble
चालल्याने शरीरास अनेक फायदे होतात.वजन नियंत्रणात रहाते.हृदय चांगले रहाते,तणाव कमी होऊन एनर्जीही मिळते
वॉकचे फायदे असल्याने लोक दरदिवशी अनेक हजार पावले चालण्याचे लक्ष्य पूर्ण करतात
परंतू वॉक करताना काही चुका केल्याने शरीरास संपूर्ण फायदे मिळत नाहीत, कोणत्या त्या चुका ?
अनेक लोक चप्पल,सँडल किंवा फॅशनेबल फुटवेअरमध्ये चालतात, याने तोटा होऊ शकतो
असे फॅशनेबल फुटवेअर पायाला योग्य सपोर्ट देत नाहीत.त्यामुळे पाय दुखणे,टाच, गुडघे आणि कंबर दुखीची तक्रार होऊ शकते
अनेकांना वाटते खूप वेगाने चालण्याने योग्य फायदा मिळतो. त्याने पायांचे स्नायू आणि सांध्यांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे आरामात सुरुवात करुन नंतर जेवढ्या वेगाने चालता येईल तेवढ्याच वेगाने चालावे.
अनेकांना वाटते की वर्कआऊटच्या वेळी पाणी पिणे गरजेचे आहे. चालून आल्यानंतर आरामात बसून २० मिनिटांनी पाणी प्यावे, चालताना घामाद्वारे पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स निघतात
जर योग्य प्रमाणात पाणी प्यायले नाही तर डिहायड्रेशन होऊ शकते.थकवा,चक्कर येणे, स्नायू जखडणे आणि एनर्जी लेव्हल घसरु शकते.
ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घ्या