शरीरात हाडे मजबूत असणे महत्वाचे आहे. कमकुवत हाडे अनेक संकटांना आमंत्रण देतात.

17 March 2025

हाडे मजबूत नसल्यास युवा अवस्थेत हाडांचे दुखणे, अशक्तपणा या तक्रारी जाणवतात.

वाढत्या वयाबरोबर हाडांची समस्या वाढत जाते. हाडांची झीज होत असते.  

हाडे वृद्धापकाळापर्यंत मजबूत ठेवायचे असेल तर त्यासाठी नियमित एक ड्रॉयफ्रूटचे सेवन करणे गरजेचे आहे. 

हाडांसाठी सर्वात चांगले ड्रॉयफ्रूट आक्रोड आहे. त्यामध्ये मँगनीजचे प्रमाण जास्त असते. 

अक्रोडात कॅल्शियम आणि लोह सारखे खनिजे असतात जे ऑस्टियोपोरोसिसला प्रतिबंध करण्यास मदत करतात.

अक्रोडमध्ये मॅग्नेशियम असते. हाडांच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. ते कॅल्शियमसाठी मदत करते. तसेच बोन लॉस होत नाही. 

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. आहारात त्यांचा समावेश करणे देखील सोपे आहे.